सल्ला क्र. कृ. वि.के./ ०७ / २०२५ महिना : जुलै
१. कृषिविद्या:
· खरीप पिकांची पेरणी ७५ ते १०० मी.मी.पाउस (जमिनीमध्ये ४ ते ५ इंच ओल) झाल्यानंतरच करावी.
· पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन :
अ.क्र.
|
पेरणीयोग्य पावसाचा आगमन कालावधी
|
कोणती पिके घ्यावीत
|
कोणती पिके घेऊ नये
|
१
|
१५ जून ते 30 जून
|
सर्व खरीप पिके
|
..........
|
२
|
१ जुलै ते ७ जुलै
|
सर्व खरीप पिके
|
..........
|
३
|
८ जुलै ते १५ जुलै
|
कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, मका, सोयाबीन, तीळ, सुर्यफुल, एरंडी.
आंतरपीक पद्धती : बाजरी+तूर (४:२), सोयाबीन+तूर (४:२), कापूस+मुंग (१:१).
|
भुईमुंग, मुग, उडीद
|
४
|
१६ जुलै ते ३१ जुलै
|
संकरित बाजरी, तूर, सुर्यफुल, सोयाबीन+तूर (४:२), बाजरी+तूर (३:३), एरंडी, करळा, हुलगा.
|
संकरित कापूस, ज्वारी, भुईमुंग.
|
· हंगामी पिकामध्ये मुलं स्थानी जलसंधारण करिता शेवटच्या डवऱ्याच्या / कोळपणीच्या वेळी कोळपाच्या जानकूडास दोरी किंवा पोते बांधून उथळ सऱ्या पाडाव्यात याव्या जेणेकरून पडणारे पावसाचे पाण्याचे संवर्धन होऊन पिकास उपलब्ध होईल.
· कापूस पिकामध्ये लागवडी नंतरचा राहिलेला खताचा दुसरा डोज कोरडवाहू करिता ४० किलो युरिया प्रति एकरी व बघायची करिता ५० किलो युरिया प्रति एकरी लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
· खरीप पिके रोपावस्थेत असताना पावसात खंड पडल्यास डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी व तसेच १३: ००: ४५(७० ग्रॅम / १० ली. पाणी ) ची फवारणी करावी.
· हंगामी पिकामध्ये पेरणीनंतर साधारणत ३० ते ४० दिवस शेत तनमुक्त ठेवणे गरजेचे आहे. त्याकरिता गरजेनुसार १-२ डवरणी व निंदन द्यावे. तसेच रासायनिक तणनाशकाचा सुद्धा वापर करावा. रासायनिक तन नाशकाचा वापर करताना जमिनीमध्ये ओल असणे गरजेचे आहे. * विविध पिकांमध्ये वापराचे तन नाशके.
पान नंबर ४ वर.
२. उद्यानविद्या:
· नवीन फळबाग लागवडीसाठी मे महिन्यात शिफारस केलेल्या अंतरावर खोदलेल्या खड्डयात दोन भाग माती एक भाग रेती व एक भाग कुजलेले शेणखत भरावे. या शिवाय एक किलो सिंगल सूपर फॉस्फेट, १ किलो निंबोळी ढेप आणि १०० ग्रॅम क्लोरोपायरीफॉस प्रत्येक खड्डयात टाकावे.
· खड्डा जमिनीच्या वर एक फूट भरावा ,पावसामुळे माती खाली बसते. खड्ड्याच्या मधोमध काठी रोवावी,म्हणजे काठी च्या जागी झाड लावायला सोपे जाते.
· कलमा लावतांना कलमांचा डोळा जमीनी पासून २०-२५ सेमी उंचीवर असावा. कलमा लावण्यापूर्वी कलमांच्या मुळांना मेफेनोक्झाँम र्ड ६८ (२.५ ग्रॅ) आणि कार्बनडाझिम(१ ग्रॅ) १ लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १०-१५ मिनीटे बुडवून लावाव्या.
· झाडाच्या बुध्याजवळ पाणी साचू देउ नये. पावसाळ्यामध्ये फळबागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून देण्यासाठी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळींनंतर ३० सें.मी. खोली, ३० सें.मी. खालची रुंदी व ४५ सें.मी. वरील रुंदी असलेले चर खोदावेत. पाण्याचा निचरा लवकर व प्रभावी होण्यास मदत होईल.
· कलमांवर डोळयाखालील भागातून निघालेल्या नवतीस काढावे.
· आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन एक आठवड्यापेक्षा जास्त काळपर्यंत पावसामध्ये खंड पडल्यास, आंबिया बहराच्या फळांची वाढ चांगली होण्यासाठी १.५ किलो पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) अधिक १.५ ग्रॅम २,४-डी प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
· आंबिया बहराच्या फळांची गळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम २, ४-डी किंवा जिबरेलीक अॅसिड अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनी घ्यावी.
· हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ३ ते ४ आठवडे (लागवड ते उगवण) या अवस्थेमध्ये दोन समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद व १.५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे.
३. पिक संरक्षण :
· कापूस पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ कामगंध सापळे लावावेत.
· कापूस पिकामध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास झाड खोडांच्या बुडाजवळ दोन बोटात धरून पायाने दाबावे. नंतर कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया अधिक १५० ग्रॅम पोट्याश १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी.
· सोयाबीन वरील प्रौढ खोडमाशीला पिकावर अंडी घालण्यास प्रतिबंध करण्यासाठी ५ % निंबोळी अर्काची ५०मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी तसेच पीक १५ दिवसाचे झाल्यास एकरी २५ पिवळे चिकट सापडे लावावेत.
· सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इथिऑन ५०% @ ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब् १५ % ६ मिली किंवा थायोमिथोक्झाम १२. ६ + लॅबडा सायहॉलोथ्रीन ९. ५ % झेडसी या संयुक्त कीटकनाशकाची २.५ मिली या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
· तुर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याशी आवळणी करावी.
· हळद पिकामध्ये हुमणी व्यवस्थापनासाठी जमिनीत पिकाच्या बुंध्याजवळ १० ते १५ सें.मी अंतरावर कार्बोफ्युरॉन ३जी प्रती हेक्टरी ४ किलो वापरावे.( जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे)
· खैऱ्या रोगग्रस्त फांद्या अन् पाने छाटुन चांगल्या प्रकारे मिसळावीत. जाळून टाकावीत. 180 ग्रॅ काॅपर आँक्सीक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लीन ६ ग्रॅम, ६० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी ३० दिवसानंतर करावी.
· सील्ला अन् पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी १२.५ मिली क्वीनॉंलफॉंस किंवा इमिडाक्लोप्रिड ५ मिली. किंवा डायमिथोएट १५ मिली, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दूसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
शंखी गोगलगाय व वानू (मिलीपिड्स) नियंत्रण:
पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्याने उगवलेल्या पिकावर गोगलगायी व पैसा / वाणूचा (मिलीपिड्स) उपद्रव दिसून येत आहे. या किडी रोप अवस्थेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.
· शेताभोवती दोन मीटर रुंदीच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यानंतर मोरचूद व कळीचा चुना २:३ या प्रमाणात मिसळून त्याचा थर राखेवर द्यावा. अशा ठिकाणी गोगलगायी व पैसा / वाणू येत नाही.
· प्रभावग्रस्त भागात कोंबड्या सोडल्यास त्या गोगलगायी व वानू वेचून खातात.
· १५ % मिठाचे द्रावण करून त्यात गोणपाटाचे तुकडे भिजवून प्रादुर्भावग्रस्त भागात एकरी १० गोणपाट ठेवावे.
· रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना १० लिटर पाण्यात १ किलो गूळ टाकून भिजवावे व प्रति एकरी चार ते पाच ठिकाणी ठेवावे. सकाळी या ढगाखाली / बारदान्याखाली जमा झालेले किडी गोळा करून नष्ट कराव्यात.
रासायनिक नियंत्रण:
· गोगलगाई: मेटाअल्डीहाईड गोळ्या, (स्नेल किल) दोन किलो ग्रॅम प्रति एकर शेतात टाकाव्यात.
· वानू (मिलीपिडस): थायोमिथोक्झाम १२. ६% + लाम्बडा सायहॉलोथ्रीन ९. ५ % झेडसी या संयुक्त कीटकनाशकाची २. ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
४. पशुसल्ला:
· जनावरांना पावसात भिजू देऊ नये. त्यांना कोरड्या गोठ्यामध्ये ठेवावे.
· गोठ्यातील जागेत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात आलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्याची व्यवस्था करावी. गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा.
· गोठ्यातील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे आवश्यक आहे. गोठ्यातील गळणारे छत तात्काळ दुरुस्त करावे.
· गोठ्यातील वातावरण पाण्यामुळे दमट होणार नाही, याची काळजी घ्यावी.
· दुधाळ जनावरांच्या कासेची जागा स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी.
शेळी पालन :-
· पावसाळ्यामध्ये पश्चिमेकडून पाऊस व वारा वाहतो. त्यानुसार शेळ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक त्या उपाययोजना कराव्या.
· शेळ्यांना ठेवण्यासाठी वेगवेगळी दालने असावीत. ज्यामुळे आजारी शेळ्या, पिले, गाभण शेळ्या व बोकड वेगवेगळे ठेवता येतील. शेळ्यांना आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गर्दी होणार नाही. पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा, तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरावा.
कुकुटपालन:-
· कोंबड्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी द्यावं. त्याच बरोबर त्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार योग्य प्रमाणात जंतूनाशकं मिसळवे.
· या दिवसात कोंबड्यांना होणारे विविध आजार, त्यांची लक्षणं यांची माहिती पशूवैद्यकांकडून घ्यावी. तसंच कोंबड्याची वेळच्या वेळी तपासणी करावी.
· कोबड्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक तयार करून त्याचं योग्य प्रकारे पालन करावं. आजारी कोंबड्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी.
५. गृहविज्ञान:
· परसबागेध्ये बियाण्यांची निवड करतांना रोग प्रतिकारक वाणांची निवड करावी.
· पाऊस नसल्यास आवश्यकते नुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बियाण्यांची योग्य निवड करावी.
· पावसाळा सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते. यामध्ये फळभाज्या, कंद,फुले, पाने, शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो उदा:-टाकळा,रान शेपू, जिवती, करटोली, वाघाटी, सुरकंद, मॅटरू इ.
· घरातील धान्य साठवणूक करताना सुपर ग्रीन बॅगचा वापर करून सुरक्षित धान्य साठवणूक करावी.
६. विस्तारशात्र:
· शेतकरी बांधवांनी १८०० १२३ २१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबर वर कॉल करून शेतीविषयक माहिती मिळवावी आणि किसान सार्थी या पोर्टल वर आपली नोंदणी करावी.
· रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले शेतकरी वरील नंबर वर कॅल करून आपले प्रश्न विचारू शकतात.
* विविध पिकांमध्ये वापराचे तन नाशक :
अ.क्र.
|
सामान्य नाव
|
तणनाशकाचे व्यापारी नाव
|
मात्रा / १० लि पाणी
|
केव्हा व कसे वापरावे
|
सोयाबीन
|
१
|
पेंडीमेथॅलीन ३०%ई.सी.
|
स्टॉम्प
|
५०-६५ मी.ली.
|
उगवणपूर्व
|
२
|
पेंडीमेथॅलीन३८.७% सी.एस.
|
स्टॉम्प एक्स्ट्रा
|
30-३५ मी. ली.
|
उगवणपूर्व
|
३
|
डायफ्लोसुलम ८४%
|
स्ट्रोगआर्म
|
0.४२ ग्राम
|
उगवणपूर्व फक्त सलग सोयाबीन पिकात
|
४
|
सलफेन्ट्राझॉन३९.६% डब्ल्यु.डब्ल्यु. एस.सी.
|
अँथॉरीटी
|
१५ मि.ली
|
उगवणपूर्व
|
५
|
सल्फेंट्राझोन२८%+क्लोमॅझोन ३०% डब्ल्यु. पी.
|
ऑथोरीटी
एनक्सटी
|
२५ ग्रॅम
|
उगवणपूर्व, सलग सोयाबीन पिकात वापरण्याकरीता
|
6
|
इमॅझिथायपर७०% डब्ल्यु.जी.
|
परसुट
|
२ ग्रॅम
|
उगवणपश्चात, २-३ पानांच्या अवस्थेत प्रसारक द्राव्य मिसळून फवारावे.
|
७
|
फ्लुथियासेट मिथिल १०.३% ई.सी.
|
ग्यालक्सी
|
२.५ मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १२ ते १५ दिवसांनी केणा, दीपमाळ, कुंजर आणि माठ तणांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी.
|
८
|
इमॅझीथायपर १० % एस.एल.
|
परसुट
|
१५-२० मि.ली.
|
सोयाबीन सलग पिकात उगवणपश्चात पीक १५ ते २० दिवसाचे असतांना किंवा २-३ पानांच्या अवस्थेत द्रावणात अमोनियम सल्फेट व प्रसारक द्रव्य योग्य मात्रेत व योग्य प्रमाणे मिसळून फवारावे.
|
९
|
इमॅझीथायपर + इमॅजोमॉक्स
|
ओडिसी
|
२ ग्रॅम
|
उगवणपश्चात, पीक १५ ते २० दिवसाचे असतांना किंवा तण २-३ पानांच्या अवस्थेत असतांना फवारणी करावी. द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मि.ली./लि. पाण्यात + २.० ग्रॅम अमोनियम सल्फेट द्यावे. सोयाबीन + तूर आंतरपिक पध्दतीमध्ये शिफारसीत.
|
१०
|
क्लोरीम्युरॉन ईथाईल २५ % डब्ल्यु. पी.
|
क्लोबेन
|
०.८ ग्रॅम
|
उगवणपश्चात, पीक १० ते २० दिवसांचे असतांना प्रसारक द्रव्य मिसळून घ्यावे.
|
११
|
क्विझॅलोफॉप पी ईथाईल ५ ई.सी.
|
टरगा सुपर
|
२० मि.ली.
|
उगवणपश्चात, पीक १५ ते २० दिवसाचे असतांना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.ली./लि. पाण्यात टाकावे.
|
१२
|
प्रोपॅक्विझाफॉप १० ई.सी.
|
एजील/
सोसायटी
|
१५ मि.ली.
|
उगवणपश्चात, उभ्या पिकात पीक १५ ते २० दिवसाचे असतांना
|
१३
|
फिनॉक्झीप्रॉप पी. ईथील १९.३ % डब्ल्यु.डब्ल्यु. ई.सी.
|
व्हिप सुपर
|
१२.५-१५ मि.ली.
|
उगवणपश्चात, पीक १५-२० दिवसाचे असतांना फवारणी नंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
|
१४
|
प्रोपॅक्विझाफॉप २.५ % + इमॅझीथायपर ३.७५ %
|
शाकेद
|
४० मि.ली.
|
उगवणपश्चात, पीक १५-२० दिवसाचे असतांना फवारणी करावी.
|
१५
|
पेंडीमेथॅलीन ३० % + इमॅझीथायपर २ % ई.सी.
|
वेल्लोर
|
५०-६० मि.ली.
|
उगवणपूर्व
|
१६
|
फ्ल्युझीफॉप पी. ब्युटील ११.१ % डब्ल्यु. डब्ल्यु. + फोमेसेफॉन ११.१ % डब्ल्यु.डब्ल्यु. एस.एल.
|
फ्युजिफ्लेक्स
|
२० मि.ली.
|
उगवणपश्चात, २०-२५ दिवसांनी
|
१७
|
बेंटाझोन ४८० एस. एल.
|
-
|
४० मि.ली.
|
उगवणपश्चात तण २-३ पानांवर असतांना पेरणीनंतर १५-२० दिवसांनी फवारावे.
|
१८
|
कलोमॅझोन ५०% ई.सी.
|
कमांड
|
३०-४० मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १५-२० दिवसांनी
|
१९
|
फल्युझीफॉप पी. ब्युटील
|
फ्युजिलिड
|
२०-४० मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १५-२० दिवसांनी गवतवर्गीय तणांचे नियंत्रण
|
२०
|
फल्युमीओक्साझीन ५० % एस.सी.
|
सनरायजिंग सुमीमॅक्स रामी, नोझोमी
|
५ मि.ली.
|
उगवणपूर्व, तसेच सलग पिकाला फायदेशीर एकदम उथळ व उताराच्या जमिनीवर फवारू नये.
|
२१
|
सोडीयम ॲसिल्फोरफेन १६.५ % + क्लोडोनिफॉप प्रोपोडील
१०% ई.सी
|
पटेला/
आयरीस
|
२० मि.ली.
|
उगवणपश्चात, पीक १५-२० दिवसाचे असतांना
|
२२
|
फोमेसाफेन १२% + क्विझॅलोफॉप ईथाईल ३ % एस.सी.
|
अमोरा
|
३० मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी
|
२३
|
क्विझॅलोफॉप पी - टेफुरील
४.४९ %
|
क्विझा, सुपर,
तेफु, पँटेरा,
पॅनारेक्स
|
१५ ते २० मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी
गवतवर्गीय तणांसाठी
|
२३
|
क्विझलोफॉप ईथाईल १०% ई.सी.+ क्लोरीमुरोन ईथाईल २५% डब्ल्यु. पी.
|
मॅक्ससोय
|
-
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी
प्रसारक द्राव्य मिसळून फवारावे.
|
तूर
|
१
|
इमॅझीथायपर + इमॅजोमॉक्स ७० डब्ल्यु.जी.
|
ओडिसी
|
२ ग्रॅम
|
उगवणपश्चात, पीक १५ ते २० दिवसाचे असतांना किंवा तण २-३ पानांच्या अवस्थेत असतांना फवारणी करावी. द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मि.ली./लि. पाण्यात + २.० ग्रॅम अमोनियम सल्फेट द्यावे. तूर+सोयाबीन किंवा
भूईमुग आंतरपिक पध्दतीमध्ये शिफारसीत.
|
२
|
पेंडीमेथॅलीन ३०% ई.सी.
|
स्टॉम्प
|
५०-६५ मि.ली.
|
उगवणपूर्व
|
३
|
इमॅझिथायपर १०% एस.एल.
|
परसूट
|
१५ मि.ली.
|
उगवणपश्चात, पेरणीनंतर ७ ते १४ दिवसांनी गवतवर्गीय व अरूंद पानी तणांसाठी वापरावे. प्रसारक द्राव्य मिसळून घ्यावे.
|
कपाशी
|
१
|
पेंडीमेथॅलीन ३०% ई.सी.
|
स्टॉम्प
|
५० ते ८०मी. ली.
|
उगवण पूर्व कापूस + तूर आंतरपीक मध्ये शिफारशीत .
|
२
|
पेंडीमेथॅलीन ३८.७% सी.एस.
|
स्टॉम्प एक्सट्रा
|
३० ते ३५मी. ली.
|
उगवण पूर्व कापूस + सोयाबीन किव्वा भुईमुग आंतर पिक मध्ये शिफारशीत
|
३
|
डायुरॉन ८०% डब्ल्यु.पी.
|
क्लास, डायुरेक्स
|
२०-४० मि.ली.
|
उगवणपूर्व
|
४
|
पायरीथीओबॅक सोडीयम १० % ई.सी.
|
हिटवीड
|
१२.५-१५ मि.ली.
|
उगवणपश्चात, उभ्या पिकात २० ते ३० दिवसाचे असतांना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये.
|
५
|
क्विझॉलोफॉप ईथाईल ५% ई.सी.
|
टरगा सुपर
|
२० मि.ली.
|
उगवणपश्चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास ३० ते ४० दिवसाचे असतांना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे. कापूस + उडीद किंवा सोयाबीन किंवा भूईमुग आंतरपिक पध्दतीमध्ये शिफारसीत.
|
६
|
फिनॉक्झिप्रॉफ पी इथील ९.३ % डब्ल्यू / डब्ल्यु/ई.सी.
|
व्हिपसुपर
|
१५ मि.ली.
|
उगवणपश्चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास ३० ते ४० दिवसाचे असतांना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे. कापूस + उडीद किंवा सोयाबीन किंवा भूईमुग आंतरपिक पध्दतीमध्ये शिफारसीत.
|
७
|
ग्लुकोसिनेट अमोनियम १३.५ %
|
बास्टा, लिबर्टी,
स्वीपपावर
|
५०-६५ मि.ली.
|
उगवणपश्चात
|
८
|
पायरीथिओ बॅक सोडीयम ६% ई.सी. + क्विझॅनोफॉप इथील ४% ई.सी.
|
हिटवीड
मॅक्स
|
२०-२५ मि.ली.
|
उगवणपश्चात उभ्या पिकात पीक २०-३०
दिवसाचे असतांना फवारावे.
|