सल्ला क्र. कृ.वि.के./ 0 ४ / २०२५ महिना : एप्रिल
१. कृषिविद्या:
· रब्बी पिके काढलेल्या शेताची त्वरित नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बुरशींचा नायनाट होईल, तसेच पेरणी साठी जमिनीची चांगली मशागत होईल.
· माती परीक्षणा करिता मातीचे नमुने काढून ते कृषि विज्ञान केंद्र किंवा शासकीय माती तपासणी प्रयोगशाळेत पाठवून माती परीक्षणाचा अहवाला नुसार पिक परत्वे रासायनिक खतांचे (कृषि निविष्ठांचे ) नियोजन करावे.
· शेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंपोष्ट खत, गांढूळ खतांचा वापर करावा. शेतातील सर्व प्रकारचा काडी कचरा न जाळता कंम्पोष्ट खताचे खंड्यात टाकून त्यास १ टन काडी कच -यात १ किलो शेंद्रीय पदार्थ कुजविणारे बुरशी मिसळावी.
· उन्हाळी भुईमूंग पिकामध्ये आ-या सुटू लागल्यानंतर कोणतीही आंतर मशागतीचे कामे करू नये. भुईमूंग पिवळा पडत असल्यास झिंक (EDTA ) २० ग्रा. प्रति १० लिटर पाणी ची फवारणी करावी.
· उन्हाळी भुईमूंग पिकाच्या संवेदनशील अवस्था जसे फुलोरा, शेंगा धरणे, शेंगा पोसणे व दाणे भरणे दरम्यान पाण्याचा ताण पडल्यास नुकसान होण्याची संभावना जास्त असते. आ-या जमिनीत जाण्यासाठी ओलावा योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. सर्व पिकास सम प्रमाणात पाणी मिळेल याची काळजी घ्यावी.
· उन्हाळी भुईमूंग पिकास शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला कॅल्शियम या अन्नघटकांच्या पूर्ततेसाठी पीक ५०% फुलोरा अवस्थेत असतांना जमिनीत १२० ते २०० किलो / एकरी जिप्समचा वापर करावा.
· तीळ पिकाच्या अधिक उत्पादना करीत पीक फुलावर व बोड्या धरण्याच्या अवस्थे मध्ये २% डी.ए.पी (२०० ग्रा. / १०ली पाणी ) ची फवारणी करावी.
· ऊस, उन्हाळी भुईमूंग, तीळ व मुंग या पिकांना ६ ते ७ दिवसांच्या अंतराने ओलीत करावे.
२. उद्यानषिद्या:
फळबाग :
· नवीन फळबागांच्या लागवडीसाठी योग्य अंतरावर ३ फूट X ३ फुट X ३ फुट लांबी रुंदी व उंचीचे खड्डे घेवून तापू द्यावेत.
· नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पीकाच्या गरजेप्रमाणे पाणी द्यावे. आळ्यात पाला पाचोळा वापरून आच्छादन करावे.
· लहान फळझाडांचे संरक्षणासाठी सावली करावी.
· संत्रा मृग बहाराचे फळांची काढणी मार्च महिन्यात संपली नसल्यास ती या महिन्याचे सुरवातीस आटोपावी त्यानंतर बागेस हलके पाणी देऊन वाळलेल्या फांद्या (सल) काढावी. कापलेल्या फांद्यांच्या टोकावर बोर्डोमलम (१ किलो चुना १ किलो मोरचूद १० लिटर पाणी) लावावा. लगेच झाडावर १० ग्रॅम कार्बेन्डाझीम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· ४ फुटापेक्षा खोल काळी जमिनीतील संत्रा बागेस मृग बहार घेण्याकरिता १५ एप्रिल पासून पाण्याचा ताण सुरु करावा.
· आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा बागेस नियमित ओलीत करावे. याकरिता दुहेरी बांगडी किंवा दोन दांड पद्धत वापरावी. आळ्यात पाला पाचोळा, गव्हांडा यांचे ३ इंच जाड आच्छादन करावे.
· संत्रा बागेत काळ्या-पांढऱ्या माशीचा उपद्रव असल्यास या महिन्याचे पहिल्या आठवड्यात १०० मि.ली. निंबोळी तेल + ७ मि.ली. मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा बीजोत्पादन:
· फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारू नये, त्यामुळे मधमाश्यांना हानी पोचते.
· आवश्यकता असल्यास हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
· मधमाश्यांची संख्या कमी झाल्याचे आढळल्यास एकरी मधमाश्यांच्या एक-दोन पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
· पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
· बियांचे गोंडे काढणीला आल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यांमध्ये ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी.
· सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत. जसजसे तयार होतील, तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे तीन ते पाचवेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंड्यांची काढणी सकाळच्या वेळी करावी. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
· गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरून पाच ते सहा दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना तीन ते चारवेळा खाली वर करावेत. चांगल्याप्रकारे सुकलेल्या गोंड्यांतून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे.
· स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
३. पिक संरक्षण :
· भुईमुग पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी म्यांकोझेब २५ ग्राम किंवा कार्बेन्डॅझिम १० ग्राम किंवा टेबुकोनाझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
· भुईमुग पिकावर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोणाझोल १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे तसेच शेंडेमर (बड नेक्रोसिस) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडीद्वारे होतो. रोगप्रसार करणाऱ्या फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट १० मिली किंवा लंबडा सायलोथ्रीन ५ % प्रवाही ६ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· भेंडी, वांगी इ. भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्क किंवा फिप्रोनील ५ % प्रवाही २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकावरील कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोप्याथ्रीन ३० % ई.सी. ५ मिली किंवा डायकोफॉल १८.५ % ई.सी. २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
· मिरचीच्या पिक वाढीच्या अवस्थेमध्ये चुरडा मुरडा हा विषाणूजन्य रोग पांढरी माशी व फुलकिडे या किडींमार्फत होतो. त्यासाठी पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे व फुलकीडीसाठी निळे चिकट सापळे ४० सापळे प्रती एकर वापरावे. रासायनिक कीडनाशकाचा वापर करायचा झाल्यास फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५ % १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
· टोमटोवरील फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी एच. ए. एन. पी. व्ही. विषाणूची २५० एलई १० मिली किंवा नोवालुरोन १० % ई.सी. १५ मिली किंवा DyksjvWVªhfuyhizksy १८.५ % प्रवाही ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात ८-१० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.
· कांदा पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मनकोझेब ७५ % डब्लू. पी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांदा पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० % प्रवाही १५ मिली किंवा लंबडा सायलोथ्रीन ५ % प्रवाही ६ मिली प्रती १० लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे.
· कलिंगड / खरबुज पिकावर नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच नागअळीच्या पतंगाला अटकाव घालण्यासाठी निळे चिकट सापळे प्रती एकरी ४० याप्रमाणे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावे तसेच प्रोफेनोफॉस २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच फळमाशी च्या नियंत्रणासाठी क्यु ल्युरचे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत.
· आंब्यावर भुरी रोगाचा तसेच तुडतुडेचा प्रादुर्भाव झाल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. ल. ३ मिली + पाण्यात विरघळणारे गंधक (सल्फर) ८० % डब्लू. पी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· संत्रावर्गीय झाडांवर सिट्रस सायलाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. ल. ५ मिली किंवा डायमिथोएट ३० % प्रवाही १५ मिली१० लिटर पाण्यातून फवारावे.
· संत्रावर्गीय झाडांवर पाने पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नोवालुरोन १० % ई.सी. ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· वांगी पिकावरील पांढरया माशीच्या व्यवस्थापनाकरीता एकरी १० ते १२ पिवळे चिकट सापळे लावावेत. किडीचे प्रमाण जास्त असल्यास डायफेंथियुरॉन १२ ग्रॅम किंवा थायमेथोक्झाम २५ डब्ल्यू जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४. पशुसल्ला:
गाय / म्हैस :
· जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर पाचट किंवा तुराट्याचे आच्छादन करावे.
· उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जनावर सावलीत बांधावे.
· संध्याकाळी जनावरे मोकळ्या जागेत बांधावी.
· ऊर्जेचा ताण कमी करण्यासाठी प्रति जनावरास ९०० ग्राम गूळ आणि ५० ग्राम मीठ प्रति दिन स्वछ पाण्यातून द्यावे.
· आहारात हिरवा व तूतुमय चारा द्यावा.
· गोठ्याला बाजूने पोते बांधावे व त्यावर पाणी शिंपडावे त्यामुळे थंडगार हवा गोठ्यात येईल.
शेळी पालन :
· शेळ्यांना झाडपाल्यांची जास्त गरज असते. त्यासाठी शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा. एक किलो वाढलेला चारा द्यावा.
· मांसवाढीसाठी पूरक घटक चाऱ्यामधून मिळत नाहीत. त्यामुळे चाऱ्यामध्ये क्षार मिश्रण, प्रतिजैविके मिसळून द्यावीत. उन्हाळ्यात अकरा ते चार या काळात भरपूर ऊन असते.
· उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे शेळ्यांना सकाळी लवकर म्हणजे सहा ते नऊ या वेळेस किंवा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत चरण्यासाठी सोडावे.
· उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्यापासून अमोनिया जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यामुळे गोठ्यातील हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
· शेळ्यांना आंत्रविषार, लाड्या, खुरकूत आणि घटसर्प रोगाचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व नंतर इलेक्ट्रोलाईट पावडर, बीकॉम्प्लेक्स द्यावे त्यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही.
· उन्हाळ्यात शेळ्यांचे खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढवावे, खाद्यात प्रथिनांचे प्रमाण १५-१८ % ठेवावे.
· शेळ्यांचे आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे, शेळ्यांच्या आहारात क्षार मिश्रण, जीवन सत्व द्यावे, खाद्यामधून जीवनसत्व सी व अ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मरतुकीस आळा बसतो.
कोंबडी पालन :
· उन्हाळ्यात कोंबड्याना खाद्य सकाळी व संध्याकाळी म्हणजे थंड वेळेत द्यावे त्यामुळे ताण कमी करू शकतो.
· पोल्ट्री शेडमध्ये पक्षांची गर्दी टाळावी आवश्यक तेवढ्या कोंबड्या ठेवावे .
· दैयनंदींन खाद्यात व्हिटॅमिन सी चा वापर साधारण पर्यंत ४०० मि . ग्राम प्रति किलो व व्हिटॅमिन ई चा २५० मि . ग्रा . प्रति किलो असा करावा.
५. गृहविज्ञान:
· तहान लागलेली नसली तरी सुधा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
· हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कापडे वापरावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी ताक इत्यादिंचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोखेदुखी, सतत येणार घाम इत्यादी मुळे उन्हाची झटके बसू शकतात व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
· घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या करण्यात यावे.
· पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
· जागो जागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
· उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच, तापमान अधिक असल्याने शारीरिक श्रम टाळावे आणि दुपारी १२. ०० ते ३. ०० या वेळेत उन्हात बाहेर पडू नये.
६. विस्तारशात्र:
· शेतकरी बांधवानी १८००-१२३-२१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकता.
७. मृदा विज्ञान :
माती परिक्षणाचे सर्व यश परीक्षणासाठी घ्यावयाच्या मातीच्या नमुन्यावरच अवलंबून असते:
- · मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा.
- · पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत माती नमुना घेऊ नये.
- · माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
- · शेता मधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरी जवळ, पाण्याचेपाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.