सल्ला क्र. कृ.वि.के./0३/ २०२५ महिना : मार्च
मार्च महिन्याचा कृषि सल्ला
१. कृषिविद्या:
· उन्हाळी तीळ पिकास पेरणी वेळेस ज्या शेतकर्यांनी सुष्म अन्नद्रव्य खते मुख्य खतांसोबत दिली नसेल अश्या परिस्थितीत पेरणी नंतर पहिल्या डव-या च्या वेळेस ८ कि. झिंक व ८ कि. सल्फर द्यावे. तीळ पिकाच्या आर्थिक मिळकती करिता पिक फुलोरा अवस्थेत असतांना व बोन्ड्या धरण्याच्या वेळेस २ % डी ए पी (२०० ग्रा./१०ली.पाणी ) ची फवारणी करावी .
· उन्हाळी भुईमुंग पिकास आ-या सुटण्यापूर्वी डव-याच्या जानकूळास दोरी बांधून मातीची भर द्यावी .५०% फुलोरा अवस्थेत उपलब्धते नुसार एकरी १२० ते २०० कि. जिप्सम दिल्यास उत्पादन वाढीस मदत होते.
· ओलिताच्या पाण्याची व्यवस्था असल्यास उन्हाळी मुंगाची पेरणी १५ मार्च पर्यंत करावी . पुसा वैशाखी या जातीचे एकरी ५ कि. बियाणे १ फुट (३०से.मी.) चे तिफणीने पेरावे. पेरणीच्या वेळी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रा./कि. व रायझोबियम जीवाणू व पी.एस.बी. ची (प्रत्येकी २५ ग्रा./ कि.) बिज प्रक्रिया करावी .
· उन्हाळी हंगामी पिकास (भुईमुंग, तीळ,) जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे .
· माती परीक्षण केले नसल्यास हंगामी पिका करिता १ फुट खोलीचे ५ ते ६ खडडे खोदून एकत्रित मातीचा अर्धा किलो नमुना कापडी पिशवीत भरून तपासणी करिता कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) येथे पाठवावा.
· कंम्पोष्ट खत तयार करण्याकरिता ५ मि. लांब २ मि.रुंद व १ मीटर खोलीचे खड्डे खोदून पर्ह्याटया व तुर्ह्याटया यांचे थ्रेशर च्या साह्याने बारीक तुकडे करून १ टन काचर्याकरिता १ कि. कंपोष्टचे जीवाणू संवर्धक टाकून उत्कृष्ट कंपोष्ट खत तयार करावे .
२. उद्यानषिद्या:
फळझाडे :
· नवीन लागवड केलेल्या फळझाडांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करा.
· नवीन फळझाडांच्या लागवड केलेल्या कलमांचे कलम जोडाखालून आलेली फूट काढून टाका.
· आंबा पिकाची फळे वाटाणा व अंडाकृती आकाराची असताना १ टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या (१३-०-४५) तीनवेळा फवारण्या कराव्यात. यामुळे फळगळ कमी होते, फळांचे वजन व आकार वाढून फळांची प्रत सुधारते.
कांदा :
· कांदा बीजोत्पादनाच्या उभ्या पिकात फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्यांना हानी पोहोचते.
· अत्यंत आवश्यक असेल, तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी.
· मधमाश्यांची संख्या कमी झाल्यास, एकरी एक-दोन मधमाश्यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
· पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
संत्रा :
· मार्च महिन्यात ”फायटोफ्थोराची“ लक्षणे झाडांच्या बुंध्यावर आढळतात. असे असल्यास हा भाग चाकूने खरडून पोटॅशिअम परमॅग्नेटने (१० ग्रॅ/लि) धुवून टाकावा आणि मेफेनोक्झॅम एम.ज़ेड ६८ ची पेस्ट लावावी. त्याचप्रमाणे मेफेनोक्झॅम एम.ज़ेड ६८ किंवा फॉंसिटिल- (२.५० ग्रॅ/लि) या बुरषीनाषकाची संपुर्ण झाड चिंब ओले होत पर्यंत फवारणी करावी.
· झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून ६० सेमी उंचीपर्यंत बोरडेक्स पेस्ट लावावी. ही पेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचुद आणि १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात प्लॅस्टिक बादलीत वेगवेगळा रात्रभर मुरवावा. दुसरे दिवशी दोन्ही बादल्यातील द्रावण एकत्र करून काठीने चांगले ढवळावे. ही पेस्ट झाडांच्या बुंध्यावर १२ तासांच्या आत लावावी.
· अंबीया बहाराची फळगळ थांबविण्यासाठी २-४-डी १.५ ग्रॅ आणि १ किलो युरीया १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· तापमानात अचानक वाढ (३५-४० डीग्री से.) झाल्यास २.४ डी १.५ ग्रॅ. + १ किलो पोटॅशिअम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3. पिक संरक्षण :
भुईमुग :
भुईमुंगावर किडींच्या नियंत्रणासाठी लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास खालील कीटकनाशकाची प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारणी करा .
• मावा व तुडतुडे : इमीडाक्लोप्रीड १७.८ % २.0 ते २.५ मी.ली.
• पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडे : लँबडा सायहँलोथ्रीन ५ % प्रवाही ४.० ते ६.० मी.ली. किवा क्वीनालफॉस २५ % प्रवाही २८ मी.ली. प्रमाणे फवारणी करावी.
• तंबाखूची पाने खाणारी अळी : मिथोमील ४०% १५ ते १७ ग्रा. किंवा क्वीनालफॉस २०% एफ २५ मि. ली.
• पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी : स्पिनोसॅड ४५ % २ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % २ ग्रॅम किंवा क्लोरअंट्रनिलीप्रोल १८.५ % २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळ फवारणी करावी.
• टिक्का व तांबेरा : प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मँकोझेब किंवा १० ग्रॅम बाविस्टीन प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तीळ :
· तीळ पिकावर पाने गुंडाळणारी अळी / पाने खाणारी अळी / तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· पानावरील ठिपके (अल्टरनारीया/सरस्कोस्पोरा) व अणूजीव करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब ७५ % २५ ग्राम किंवा कॉपर ऑक्सिक्लोरॉईड २५ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा :
· घाटे अळीही हरभऱ्यावरील मुख्य किड आहे. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रणाचा अवलंब करावा.
· एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठया प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो.
· पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठया रोवाव्यात किंवा मचान बांधावीत. म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळया पकडून खातात.
· हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.
· पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी एच.ए.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.
· तरीही किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास, क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) २.५ मि.लि. किंवा फ्ल्युबेन्डॅमाईड (४८ एससी) २.५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· हरभरा पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २५ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
भाजीपाला:
· भेंडी, वांगी इ. भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ % निंबोळी अर्क किंवा फिप्रोनील ५ % प्रवाही २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकावरील कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोप्याथ्रीन ३० % ई.सी. ५ मिली किंवा डायकोफॉल १८.५ % ई.सी. २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
· सध्याच्या हवामानामुळे कांदा पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मनकोझेब ७५ % डब्लू. पी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांदा पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० % प्रवाही १५ मिली किंवा लंबडा सायलोथ्रीन ५ % प्रवाही ६ मिली प्रती १० लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे.
· मिरची पिकावर सध्याच्या हवामानामुळेमावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निंबोळी अर्क ५ % किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. ल. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
· टोमटोवरील फळे पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी एच.ए.न.पि.व्ही. २५० एल.ई.१० मिली किंवा नोवालुरोन १० % ई.सी. १५ मिली किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) प्रवाही ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात ८-१० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.
फळबाग :
· कलिंगड / खरबुज पिकावर नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच नागअळीच्या पतंगाला अटकाव घालण्यासाठी निळे चिकट सापळे प्रती एकरी ४० याप्रमाणे पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावे तसेच प्रोफेनोफॉस २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच फळमाशी च्या नियंत्रणासाठी क्यु ल्युरचे एकरी ५ कामगंध सापळे लावावेत.
· आंब्यावर भुरी रोगाचा तसेच तुडतुडेचा प्रादुर्भाव झाल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. ल. ३ मिली + पाण्यात विरघळणारे गंधक (सल्फर) ८० % डब्लू. पी. २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· संत्रा-मोसंबी-लिंबूच्या झाडावर खोड कीड किंवा ईंडरबेला या साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, अळीच्या छिद्रावरून जाळे काढावे. इंजेक्शनच्या मदतीने क्लोरपायरीफॉस (५० ईसी) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी हे द्रावण छिद्रात टाकावे. त्यावर कापसाचा बोळा वरील द्रावणात बुडवून लावावा. ओली माती, रॉकेल किंवा पेट्रोल वापरू नये.
· पाने पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २० मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ई.सी.) १० मि.लि. १० प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
४. पशुसल्ला:
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र
चारा पिके –
उन्हाळ्यामध्ये दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणेसाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार खालीलपैकी चारा पिके घ्यावीत.
१. मका :
· चारा पिकासाठी मका पिकाची पेरणी मार्च ते एप्रिल दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी, आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगा सफेद-२ इ. जातींची निवड करावी. चारा पिकासाठी हेक्टरी ७५ कि.ग्रँ. बी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर जिवाणूची बिजप्रक्रीया करावी.
· पेरणीच्या वेळी हेक्टरी १०० की.ग्रँ. नत्र. ५० कि.ग्रँ. स्फुरद व ५० कि.ग्रँ. पालाश अशी खतांची मात्रा द्यावी.
· हेक्टरी उत्पादन – प्रती हेक्टरी ५० ते ६० टन हिरवा चारा.
२. ज्वारी :
· चारा पिकासाठी ज्वारीची पेरणी मार्च ते एप्रिल दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी रुचिरा (आर.एस.११-४) फुले अमृता, मालदांडी, निळवा, एम.पी.चारी, एस.एस.जी.५९-३ या जाती निवडाव्यात. ज्वारी चारा पिकासाठी हेक्टरी ४० किलोग्रँम बी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर जिवाणूची बिजप्रक्रीया करावी.
खते :
· पेरणीच्यावेळी हेक्टरी ८० कि.ग्रँ. स्फुरद व ४० कि.ग्रँ. पालाश अशी खतांची मात्रा द्यावी.
· हेक्टरी उत्पादन – प्रतीहेक्टरी ४५ ते ५० टन हिरवा चारा.
३. बाजरी :
· चारा पिकासाठी उन्हाळी बाजरीची पेरणी मार्च ते एप्रिल दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी बाजरीच्या जाएंट बाजरा व या वाणांची निवड करावी. हेक्टरी १० किलोग्रँम बी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर जिवाणूची बिजप्रक्रीया करावी.
खते :
· पेरणीच्यावेळी हेक्टरी ६० कि.ग्रँ. नत्र, ३० की.ग्रँ. स्फुरद अशी खतांची मात्रा द्यावी.
· हेक्टरी उत्पादन – प्रती हेक्टरी ४५ ते ५० टन हिरवा चारा.
४. चवळी :
· चारा पिकासाठी चवळीची पेरणी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. पेरणीसाठी श्वेता, ई.सी. ४२१६, यु.पी.सी. ५२८६ या वाणांची निवड करावी. हेक्टरी ४० कि.ग्रँ. बी वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यावर रायझोबियम जिवाणूची बिजप्रक्रीया करावी.
खते :
· पेरणीच्यावेळी हेक्टरी २० की.ग्रँ. नत्र, ६० की.ग्रँ. स्फुरद अशी खतांची मात्रा द्यावी.
· हेक्टरी उत्पादन – प्रतीहेक्टरी ३० ते ३५ टन हिरवा चारा.
५. गृहविज्ञान:
· शेतकरी महिलांनी उन्हाळ्यात शेतात काम करतांना सुती कपडे वापरावे. डोक्याला सुती रुमाल बांधावा.
· शेतकरी महिलांनी हरभरा सोंगनि करिता हरभरा सोंगनि हातमोज्याचा वापर करावा .
· मशरूम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तापमान वाढत असल्यामुळे शेड मधील तापमान व आद्रता नियंत्रित ठेवण्यासाठी वेळेनुसार पाण्याचे नियोजन करावे.
· उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे जास्त पाणी असणाऱ्या फळांचा आहारामध्ये समावेश करावा तसेच ३ ते ४ लिटर पाणी दिवसाला प्यावे.
६. विस्तारशात्र:
· शेतकरी बांधवानी १८००-१२३-२१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकता.
७. मृदा विज्ञान :
माती परिक्षणाचे सर्व यश परीक्षणासाठी घ्यावयाच्या मातीच्या नमुन्यावरच अवलंबून असते:
· मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा.
· पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत माती नमुना घेऊ नये.
· माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.
· शेता मधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरी जवळ, पाण्याचेपाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे:
· मातीचा एका नमुन्या करिता सर्वसाधारणपणे २-८ एकर पर्यंत जमिनेचे क्षेत्र असावे, परंतु जमिनी मध्ये फरक असल्यास उदा. रंग, चढ-उतार, खडकाळपणा, निचराशक्ती. इत्यादी बाबींचा विचार करून जमिनीच्या फरकाप्रमाणे वेग वेगळा नमुना घ्यावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
· एका हेक्टर मधून १५ ते २० ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी टिकासाच्यासाहाय्याने इंग्रजी (व्ही) आकाराचा खड्डा करावा हंगामी पिकासाठी २५ सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील मातीबाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
· खड्ड्याच्या सर्वबाजूने सारख्या २-३ से. मी जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.
· अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एकाशेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरा समोरचे दोन भाग वगळावेत.
· अशा तऱ्हेने शेवटी अर्धा किलो ग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे.
· अशा प्रकारे तयार झालेले नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यापूर्वी त्यानमुन्याच्या पिशवी मध्ये शेतकऱ्याने खालील माहिती भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हेनंबर/ गटनंबर व मागील हंगामात घेतलेले पीक पुढील हंगामात घेत असणारी पिके.