सल्ला क्र. कृ.वि.के./१२/ २०२3 महिना: डिसेंबर
कृषि विषयक सल्ला
· कृषिविद्या:
· तूर पिकाची पाण्याची गरज, वाढीची अवस्था, जमिनीतील ओल इ. बाबी विचारात घेऊन सिंचनाचे नियोजन करावे. पिकाला गरज असल्यास तुषार सिंचनाची किंवा पाट पाणीद्वारे सिंचन करावे व तसेच पिक दाने भरण्याच्या अवस्थे मध्ये १३:००:४५ (१००ग्राम+ १० लिटर पाणी) ची फवारणी केल्यास दाण्याची साईज व वजन वाढण्यास मदत होते. वातावरनाच्या बदला मुळे व धुवारी मुळे नेसर्गिक फुल गळ होण्याची संभावना असते अश्या परिस्तिथी मध्ये फुलगळ रोखण्या करिता (बोरोन २० ग्राम किंवा Naphthalene acetic acid (NAA) २.५ मिली+ १०लिटर पाणी) ची फवारणी करावी. शक्कअसल्यास शेताच्या धुऱ्यावर सकाळी वसायंकाळी धूर करावा जेणे करून तापमान समतोल राखण्यास मदत होईल.
· कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेतात गुरे, ढोरे, शेळ्या मेंढ्या चरावयास सोडाव्यात. यामुळे किडींच्या बोंड अळ्या व त्यांचे कोष नष्ट होतील. कपाशीचे पिक डिसेंबरच्या आत संपवावे. पुढील हंगामातील बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्या साठी फरदड घेऊ नये.
· हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३० ते ४५ दिवसांत शेत तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच कराव्यात.
· बागायती गव्ह्याची उशिरा पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करावी , त्या करीता PDKV सरदार (AKAW ४२१०-६), AKAW ४६२७, AKW ३८१, AKW १०७१ (पूर्णा) या वाणाची निवड करावी.
· उद्यानविद्या:
फळबाग:
· थंडीची तीव्रता वाढल्यास फळबागांचे थंडीपासून संरक्षण करा. त्यासाठी फळबागांना सायंकाळी पाणी द्या. तसेच बागेत रात्री शेकोट्या धुपत ठेवा.
संत्रा:
· संत्रा बागा आंबिया बहारा करीता ताणावर सोडाव्यात, ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे.
· आंबिया बहारासाठी हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस , मध्यम जमीनीत ४५ ते ६० दिवस आणि भारी जमीनीत ५५ ते ७५ दिवस ताण दयावा.
· मृग बहाराचे एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापण करताना खताची चौथी मात्रा ९० ग्रॅम नत्र (१९५ ग्रॅम यूरिया) + ७५ ग्रॅम पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश १५० ग्रॅम) प्रति झाड दयावे.
· मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, १ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
हळद:
· शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे युरीया इत्यादी देऊ नये. जर युरिया सारखी खते दिली तर पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते.
· पिक संरक्षण:
· कापूस पिकाची हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किड ग्रस्त बोंडासहित पर्ह्याटयाची सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी.
· हंगाम संपल्या बरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षीचे भक्ष होऊन नष्ट होतील.
· कापूस साठवणूक व संकलन केंद्रे, जिनिंग मिल्स इ. ठिकाणी कापूस येण्यास सुरवात झाल्यापासून साफ सफाई मोहीम राबवून कापूस जिनिंग नंतर चाळणी वरच्या अळ्या, कोष, कवडी व खराब कापूस ची वेळोवेळी त्वरित विल्हेवाट लावावी व त्या परिसरात बिगर हंगामात पूर्ण वेळ प्रक्तेकी १५ ते २० कामगंध सापळे लावून सापळ्या मध्ये अडकलेले पतंग नियमित नष्ट करावे. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे डिसेंबर पूर्वी वेचणी पूर्ण करावी. खोडवा पिक (फरदड) घेणे टाळावे. पिकांचा पालापाचोळा व इतर अवशेष पर्ह्याटयाचा लवकरात लवकर नायनाट करावा.
· हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २५ मि.ली. किंवा क्विनोलफोस २५ ई.सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
· शक्यतो एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून ५ टक्के निंबोळी अर्क, एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची २५० एलई प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच पक्षी थांबे हेक्टरी ५० व कामगंध सापळे एकरी ५ प्रमाणे शेतात लावावे.
· हरबरा व तूर पिकामध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५० ग्राम प्रति १० लि. पाण्यात मिसळून ५० ते १०० मिली झाडाची आवळणी करावी.
· तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची २५० एलई प्रति हेक्टर किंवा इमामेक्टीन बेन्झोंएट ४ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवाराणी करावी.
· मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून जाळून नष्ट करावी.
· गहू पिकावरील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के प्रवाही किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ४ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवाराणी करावी.
· भाजीपाला पिकावरील रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी ५० मिली अर्क किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के४ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवाराणी करावी.
· कांदा पिकावरील करपा रोग व फुलकिडे नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल १० ग्राम + फिप्रोनील ५ टक्के १० मिली/१० लि. पाण्यात मिसळून फवारावी.
· हळदी पिकावरील करपा रोगासाठी मेंकोझेब २५ ग्र. किंवा कॉपर ओक्झीक्लोराईड ३० ग्रा. किंवा हेक्झाकोनाझोल १० मिली/ १० लि. पाण्यात मिसळून फवारावी.
· शेंग माशी, शेंगा पोखरणारी अळी आणि पिसारी पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी, इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (२० डब्ल्यूजी) ५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ३ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी.
· पशुसल्ला:
· जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पाणी जास्त थंड असल्यासही गाई-म्हशी पाणी कमी पितात, पोटातील आम्लता वाढते. त्यामुळे उत्पादन व शरीरस्वास्थ्य इत्यादीवर विपरीत परिणाम होतो. शक्य झाल्यास गाई-म्हशींना कोमट पाणी पिण्यास द्यावे.
शेळी पालन :
· शेळ्या-मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे शेळ्यांना वजनाच्या अर्धा टक्के किंवा १००-२५० ग्रॅम खुराक देणे गरजेचे आहे. शेळ्यांना ओला व सुका चारा दोन्ही देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा. कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते.
· आहारात बदल करताना हळूहळू करावा. हिवाळ्यात वाढत्या वयाच्या करडांना जास्त चांगल्या प्रतीचा चारा आवश्यक असतो. याशिवाय ३-४ आठवड्यांनंतर करडांना दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम आंबोण मिश्रण आणि खातील तेवढी हिरवी वैरण देणे आवश्यक आहे.
· आंबोणाचे रोजचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन रोज प्रत्येकी २५० ग्रॅम पर्यंत आणावे. साधारणता चार महिन्यांनंतर वयात येईपर्यंत, मटणासाठी विकण्यापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची वैरण पुरेशी असते. ती उपलब्ध नसल्यास वैरणीशिवाय २००-२५० ग्रॅम आंबोण मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे.
· चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढीचा दर मिळतो. करडांचे आहाराचे दोन भाग असतात. वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिने, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजे वेगवेगळी धान्ये (मका, गहू, ज्वारी) आणि त्यांचे दुय्यम पदार्थ (उदा. कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा इत्यादी). प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई इत्यादी) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इत्यादी) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यातून शरीर थंडीत उबदार राहण्यास मदत होते.
कुक्कुट पालन :
· आहार व्यवस्थापन - हिवाळ्यात कमी तापमानामुळे कोंबड्या जास्त खाद्य खातात, त्यामुळे त्यांच्या खाद्यात योग्य बदल करावेत. आहारात ऊर्जावर्धक घटकांचे प्रमाण वाढवावे (१०० किलो कॅलरीज प्रति किलो खाद्य) आणि प्रथिनांचे प्रमाण १ ते २ टक्के कमी करणे आवश्यक असते. खाद्यामध्ये अ, क आणि ई या जीवनसत्त्वांचे प्रमाण वाढवावे.
· गृहविज्ञान:
· परसबगेला पाणी व्यवस्थापन करावे.
· मशरूम लागवड झाल्यानंतर २० दिवसांनी मशरूम बेड ला पिंहेड्स आल्यावर पाणी स्प्रे करावे. मशरूम लागवड केलेल्या शेडमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसू नये यासाठी प्रति लिटर १ एम एल फॉर्मलिंची फवारणी करावी.
· विस्तारशात्र:
· शेतकरी बांधवानी १८००-१२३-२१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबरवर फोन करून शेतीविषयक माहिती मिळवू शकता.
**********